‘मतपत्रिकेवर पहिले नाव आनंदराव अडसुळ…,’ कॅप्टन अभिजीत अडसुळ यांचा दावा
अमरावती मतदार संघातून नवनीत राणा भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविणार असा दावा रवी राणा करीत आहेत. आणि प्रचाराला आनंदराव अडसुळ आणि अभिजीत अडसुळ येणार असाही दावा राणा दाम्पत्य करीत असताना कॅप्टन अभिजीत अडसुळ यांनी आपली भूमिका मांडली आहेत.
मुंबई | 9 मार्च 2024 : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढविणार असल्याचा दावा राणा दाम्पत्य करीत आहे. लवकरच नवनीत प्रचाराला सुरुवात करतायत असे म्हटले जात होते. यावर माजी खासदार आनंदराव अडसुळ यांचे पूत्र कॅप्टन अभिजीत अडसुळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे. 4 तारखेला जे.पी. नड्डाजी नागपूरला आले होते. त्यावेळी नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार असा दावा केला जात होतो. पक्ष प्रवेश तर राहीला बाजूला नवनीत राणा यांना बोलण्याची संधी देखील दिली नाही. नवनीत राणा यांना भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध आहे. दुसरीकडे सर्व सर्व्हे त्यांच्या विरोधात आहेत. तर दुसरीकडे त्याच्या बोगस जात प्रमाणपत्राची केसमध्ये आम्ही हायकोर्टात जिंकलो होतो, आता सर्वोच्च न्यायालयात केस अंतिम टप्प्यात आहे. राणा दाम्पत्य निकाल त्यांच्या हातात असल्याच्या आविर्भावात वागत आहेत. सात वेळा आम्ही ही जागा लढविली होती. आता आठव्यांदा आम्ही लढविणार आहोत, मतदान पत्रिकेवर पहिले नाव आनंदराव अडसुळ किंवा कॅप्टन अभिजीत अडसुळ यांचे असेल असे ठाम मत कॅप्टन अभिजीत अडसुळ यांनी मांडले आहेत.