“…म्हणून उद्धव ठाकरे यांना आमदार सोडून गेले”, पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीवरून शिवसेनेची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला रोखण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारच्या पाटणामध्ये विरोधकांची बैठक बोलावली होती. या बैठकीला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, अरविंद सावंतांसह इतर प्रमुख नेते उपस्थित होते. विरोधी पक्षांच्या या बैठकीवर शिवसेना नेते अभिजीत अडसूळ यांनी टीका केली आहे.
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देशासह राज्यातील पक्षांनी तयारी सुरु केली आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला रोखण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारच्या पाटणामध्ये विरोधकांची बैठक बोलावली होती. या बैठकीला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, अरविंद सावंतांसह इतर प्रमुख नेते उपस्थित होते. विरोधी पक्षांच्या या बैठकीवर शिवसेना नेते अभिजीत अडसूळ यांनी टीका केली आहे. “ठाकरे गटाने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला हे पाटण्याच्या बैठकीतून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. उद्धव ठाकरे जरी बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र असले तरी त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा कधीच सोडला आहे. त्यामुळेच त्यांना आमदार सोडून गेले. 40 आमदार आणि 13 खासदार यांनी उठाव करून राज्यात खरं हिंदुत्वाचं सरकार आणलं,” असं अडसूळ म्हणाले.