विरोधीपक्ष नेते पदावरील काँग्रेसच्या दाव्याने महाविकास आघाडीत धुसफूस का?

विरोधीपक्ष नेते पदावरील काँग्रेसच्या दाव्याने महाविकास आघाडीत धुसफूस का?

| Updated on: Jul 13, 2023 | 11:57 AM

त्याचदरम्यान आता १७ जुलै पासून शिंदे-फडणवीस-पवार सरकारचं पावसाळी अधीवेशन सुरू होणार आहे. मात्र अजूनही विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती झालेली नाही. तर विरोधीपक्ष नेते पदावरून महाविकास आघाडीत ही रस्सी खेच होताना दिसत आहे.

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिल्याने विधान सभेतील विरोधी नेते पद हे रिक्त झालं आहे. त्याचदरम्यान आता १७ जुलै पासून शिंदे-फडणवीस-पवार सरकारचं पावसाळी अधीवेशन सुरू होणार आहे. मात्र अजूनही विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती झालेली नाही. तर विरोधीपक्ष नेते पदावरून महाविकास आघाडीत ही रस्सी खेच होताना दिसत आहे. तर त्यावर आता विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या पदावर काँग्रेसचा दावा केला आहे. मात्र याच दरम्यान विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असल्याने दोन्हा विरोधी नेते पदावर काँग्रेसकडून दावा केला जात आहे. यावरून काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य अभिजित वंजारी यांनी, ‘ठाकरे गटाचे तीन सदस्य त्यांना सोडून गेलेय, त्यामुळे आता विधानपरिषदेत आमची संख्या जास्त’ आहे. ठाकरे गटाचे आठ आमदार तर आता आमचे आमचे नऊ आहेत. त्यामुळे आता हे पद काँग्रेसला मिळावं अशी मागणी वंजारी यांनी केली आहे. याबाबत वंजारी यांनी काँग्रेस प्रभारी एच के पाटील, के सी वेणयुगोपाल यांना पत्र लिहून केली हायकमांडकडे केली विनंती केली आहे.

Published on: Jul 13, 2023 11:57 AM