अभिषेक बच्चन करणार राजकारणात एन्ट्री? या पक्षातून निवडणूक लढवण्याची शक्यता…
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. लोकसभेसाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. असं असतानाच एका चर्चेने राजकारणात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. लोकसभेसाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. असं असतानाच एका चर्चेने राजकारणात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमिताभ बच्चन हे स्वत: उत्तर प्रदेशमधल्या इलाहाबाद मतदार संघाचे खासदार होते. तर आई जया बच्चन या समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार होत्या. त्यामुळे अभिषेक बच्चन देखील सपामधून निवडणूक लढवणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
Published on: Jul 16, 2023 09:24 AM
Latest Videos