अपघातांचा सिलसिला; आता माजी मंत्री बच्चू कडू थोडक्यात बचावले

अपघातांचा सिलसिला; आता माजी मंत्री बच्चू कडू थोडक्यात बचावले

| Updated on: Jan 11, 2023 | 11:10 AM

भाजपचे आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे, माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झाला होता

अमरावती : राज्यातील नेत्यांच्या अपघाताचा सिलसिला काही थांबण्याचे नाव घेत नाही. याच्या आधी भाजपचे आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे, माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झाला होता. दैव बलवत्तर म्हणून त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. यानंतर आता प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री, आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. त्यामुळे या अपघातला ब्रेक लागणार कधी असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

बच्चू कडू हे रस्ता ओलांडताना त्यांना दुचाकीने जोरदार धडक दिल्याने ते पडले. त्यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला जबर मार लागला आहे. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावही झाला. मात्र, सुदैवाने बच्चू कडू या अपघातातून बचावले आहेत.

बच्चू कडू हे आज पहाटे 6 ते 6.30च्या दरम्यान रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी सुस्साट वेगात आलेल्या दुचाकीने बच्चू कडू यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे बच्चू जागेवरच कोसळले. त्यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला जबर मार लागला.तर डोक्यातून रक्तस्त्राव त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं.

Published on: Jan 11, 2023 11:10 AM