‘न्यूज अरेना इंडिया’च्या सर्व्हेचा डबल धमाका! राज्यात भाजपच अव्वल तर मुख्यमंत्री म्हणून पसंती कोणास?

‘न्यूज अरेना इंडिया’च्या सर्व्हेचा डबल धमाका! राज्यात भाजपच अव्वल तर मुख्यमंत्री म्हणून पसंती कोणास?

| Updated on: Jun 20, 2023 | 7:01 AM

आता ‘न्यूज अरेना इंडिया’च्या सर्व्हेची जोरदार चर्चा सुरू आहे. ज्यामुळे आता पुन्हा वाद होणार का अशीच चर्चा आता पारावर होताना दिसत आहे. ‘न्यूज अरेना इंडिया’च्या सर्व्हेत आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात काय चित्र असेल याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून जाहिरातीमुळे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आणि दोन्ही पक्षात कटूता आली होती. हा विषय संपल्यात जमा असतानाच आता ‘न्यूज अरेना इंडिया’च्या सर्व्हेची जोरदार चर्चा सुरू आहे. ज्यामुळे आता पुन्हा वाद होणार का अशीच चर्चा आता पारावर होताना दिसत आहे. ‘न्यूज अरेना इंडिया’च्या सर्व्हेत आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात काय चित्र असेल याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या सर्व्हेत राज्यात पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुलणार, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अवघ्या 17 ते 19 जागांवर समाधान मानावं लागेल असा अंदाज आहे. तर शिंदे गटाच्या शिवसेनेला 25, राष्ट्रावादी काँग्रेसला 55-56 जागा, काँग्रेसला 50-53 आणि इतर पक्षांना 12 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर याच सर्वेक्षणानुसार, मुख्यमंत्रीपदासाठी मतदारांची कोणाला सर्वाधिक पसंती आहे, याचीही माहिती देण्यात आलीय. त्यानुसार, सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 35%, काँग्रेसचे अशोक चव्हाण यांना 21%, सध्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना 14%, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 12%, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 9% मतदारांची पसंती असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिंदे गट-भाजपमध्ये सर्वाधिक पसंतीचा मुख्यमंत्रीवरून धुसफूस होणार का हा त्यावर स्पेशल रिपोर्ट

Published on: Jun 20, 2023 07:00 AM