सावधान! बिपरजॉय मुंबईकडे सरकतोयं?; किनार पट्ट्यांनाही सतर्कतेचा इशारा, मोसमी पाऊसही होणार दाखल
बिपरजॉय चक्रीवादळ गोव्याच्या पश्चिमेस सुमारे 700 किमीवर आणि मुंबईच्या नैऋत्येला 630 किमीवर आहे. आगामी 24 तासांत ते आणखी तीव्र होऊन ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे.
मुंबई : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार बिपरजॉय चक्रीवादळ पुढील 24 तासांत तीव्र होणार आहे. बिपरजॉय चक्रीवादळ 10 जून रोजी पूर्व मध्य अरबी समुद्रात केंद्रीत होते असेही IMD ने म्हटले आहे. तर पुढील २४ तासांत ते आणखी तीव्र होऊन उत्तर-ईशान्येकडे सरकण्याची दाट शक्यता असल्याचेही विभागाकडून सांगण्यात आलं आहे. बिपरजॉय चक्रीवादळ गोव्याच्या पश्चिमेस सुमारे 700 किमीवर आणि मुंबईच्या नैऋत्येला 630 किमीवर आहे. आगामी 24 तासांत ते आणखी तीव्र होऊन ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे. त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टी आणि गुजरातमध्येही जाणवेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर बिपरजॉय चक्रीवादळामुळं सोमवापर्यंत गोवा आणि महाराष्ट्रात मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तसेच किनारपट्टी भांगाना सतर्कतेचा इशारा देताना 10 जून रोजी वाऱ्याचा वेग 35-45 किमी प्रतितासपर्यंत पोहोचेल. तर 11 जून रोजी वादळी वाऱ्याचा वेग 40-50 किमी प्रतितास आणि 60 किमी प्रतितास पर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचे म्हटलं आहे आहे. 12 जून दरम्यान वादळी वाऱ्याचा वेग 55 किमी ताशी 65 किमी ताशी आणि 13 ते 15 जून दरम्यान 50-60 किमी ताशी 70 किमी प्रतितास होण्याची शक्यता आहे.