धक्कादायक; जे. जे. रुग्णालयात चौकशी समिती अहवालात डॉ. तात्याराव लहाने दोषी? अहवालातून काय आलं समोर?

धक्कादायक; जे. जे. रुग्णालयात चौकशी समिती अहवालात डॉ. तात्याराव लहाने दोषी? अहवालातून काय आलं समोर?

| Updated on: Jun 17, 2023 | 10:30 AM

त्यांच्याविरोधात निवासी डॉक्टरांच्या संघटनेने आंदोलन केलं होतं. त्यानंतर तात्याराव लहाने आणि डॉक्टर रागिनी पारेख यांच्या इतर 7 ते 8 डॉक्टरांनी राजेनामे दिले होते. जे सराकारकडून मान्य करण्यात आले होते. तर लहाने यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ज्यांच्या चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली होती.

मुंबई : मुंबईतील जेजे रुग्णालयातील मानद प्राध्यापक डॉक्टर तात्याराव लहाने आणि डॉक्टर रागिनी पारेख यांच्यावर निवाशी डॉक्टरांनी आरोप केले होते. तर त्यांच्याविरोधात निवासी डॉक्टरांच्या संघटनेने आंदोलन केलं होतं. त्यानंतर तात्याराव लहाने आणि डॉक्टर रागिनी पारेख यांच्या इतर 7 ते 8 डॉक्टरांनी राजेनामे दिले होते. जे सराकारकडून मान्य करण्यात आले होते. तर लहाने यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ज्यांच्या चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली होती. त्याचा आता अहवाल आला आहे. धक्कादायक म्हणजे या समितीने लहाने यांच्यावर विनापरवानगी शस्त्रक्रिया केल्याचा ठपका ठेवला आहे. तर या चौकशी अहवालानुसार, सरकारची कोणतीही अधिकृत परवानगी नसताना डॉ. लहाने यांनी रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या असा ठपका ठेवण्यात आला आहे. तर या समितीच्या चौकशी अहवालानुसार, लहाने यांनी सरकारच्या मान्यतेशिवाय किंवा कुठलीही ऑर्डर नसताना 698 शस्त्रक्रिया केल्या आहेत. जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी डॉ. तात्याराव लहाने, नेत्रचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी त्रीसदस्यीय समिती नेमली होती. ज्याचा अहवाल 12 जून रोजी आला आहे.

Published on: Jun 17, 2023 10:30 AM