Special Report | कुणाचं प्रमोशन, कुणाचं डिमोशन?

Special Report | कुणाचं प्रमोशन, कुणाचं डिमोशन?

| Updated on: Aug 14, 2022 | 9:31 PM

शिंदे सरकारच्या स्थापनेपासून तब्बल दीड महिन्यानंतर खातेवाटप जाहीर झाले असले तरी या खातेवाटपामध्ये भाजपचेच वर्चस्व राहिले आहे. पण भाजपमधल्या काही ज्येष्ठ नेत्यांना कमी महत्त्वाची खाती देण्यात आल्याची चर्चा आता होऊ लागल आहे.

शिंदे सरकारच्या स्थापनेपासून तब्बल दीड महिन्यानंतर खातेवाटप जाहीर झाले असले तरी या खातेवाटपामध्ये भाजपचेच वर्चस्व राहिले आहे. पण भाजपमधल्या काही ज्येष्ठ नेत्यांना कमी महत्त्वाची खाती देण्यात आल्याची चर्चा आता होऊ लागल आहे. शिंदे गटाच्या वाट्याला प्रशासन आणि माहिती तंत्रज्ञान माहिती आणि जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, पणन, सामाजिक न्याय, मदत आणि पुनर्वसन आपत्ती, व्यवस्थापन, जलसंधारण, अल्पसंख्यांक हे विभाग मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे ठेवले आहेत तर गृह, अर्थ, जलसंपदा निर्माण, ऊर्जा, विधी आणि न्याय ही खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे ठेवली आहेत. त्यामुळे आता खातेवाटपावरुन जोरदार चर्चा होऊ लागली आहे. राधाकृष्ण विखे पाटलांकडे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास तर सुधीर मुनगंटीवारांकडे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्रालय देण्यात आले. तर चंद्रकांत पाटलांकडे उच्च आणि तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्रालय सोपवण्यात आले आहे. या खातेवाटपामुळे आता आणखी चर्चा रंगू लागल्या आहेत.