Prashant Koratkar : कोरटकरच्या सुनावणी दरम्यान कोर्टात काय झालं? इनसाईड स्टोरी
Prashant Koratkar Court Hearing : प्रशांत कोरटकर याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांनी कोरटकर याला 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला आज पोलिसांनी कोर्टात हजर केलं आहे. या प्रकरणी सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे. पोलिसांनी अधिकच्या तपासासाठी कोर्टाकडे कोरटकर याची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे.
दरम्यान, कोर्ट सुनावणी दरम्यान आरोपी कोरटकर याने मोबाईलच्या माध्यमातूनच धमकी दिली, मिळालेला मोबाईल हा कोरटकरचाच आहे असं वकील असीम सरोदे यांनी म्हंटलं आहे. इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे हे सध्या कोर्टात युक्तिवाद करण्यात आला आहे. आरोपी फरार असतानाच्या काळात त्याला कोणी कोणी मदत केली याची देखील चौकशी व्हावी अशी मागणी सरोदे यांनी कोर्टाकडे केली आहे. तर याच मोबाईलवरून कोरटकर याने शिवरायांचा अपमान केला आणि पत्नीच्या माध्यमातून कोरटकर याने त्याचा मोबाईल आम्हाला दिला असल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे. तसंच गुन्हा दाखल झाल्यापासून कोरटकर फरार होता. त्यामुळे त्याची चौकशी करण्यासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी पोलिसांनी कोर्टाकडे केली आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
