दया कुछ तो गड़बड़ है, पुणे पोर्श कार अपघात प्रकरणाला नवीन वळण, आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवालांना अटक

दया कुछ तो गड़बड़ है, पुणे पोर्श कार अपघात प्रकरणाला नवीन वळण, आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवालांना अटक

| Updated on: May 25, 2024 | 11:31 AM

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक केली आहे.

Pune Porsche accident: पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. याआधी न्यायालयाने मुख्य आरोपी विशाल अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र अग्रवाल यांनी ड्रायव्हरला धमकावले आणि ड्रायव्हरला दोन दिवस अग्रवाल यांच्या बंगल्यातच डांबून ठेवल्याचा उल्लेख. त्याला घरी जाऊ दिले नाही. ड्रायव्हरचा मोबाईल काढून घेऊन हा अपघाताची जबाबदारी स्वतःवर घे नाहीतर याद राख अशी धमकी दिली. त्यानंतर चालकाने सुरेंद्र अग्रवाल विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून, त्या आधारे सुरेंद्र अग्रवाल यांच्यावरही अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 365, 366 आणि आयपीसीच्या इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

Published on: May 25, 2024 11:21 AM