Navneet Rana | पोलीस आयुक्तांवर कारवाई झाली पाहिजे, खासदार नवनीत राणा यांची मागणी

Navneet Rana | पोलीस आयुक्तांवर कारवाई झाली पाहिजे, खासदार नवनीत राणा यांची मागणी

| Updated on: Sep 08, 2022 | 2:36 PM

Rana | अमरावती येथील मुलीच्या बेपत्ता प्रकरणात पोलीस आयुक्तांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

Navneet Rana | अमरावती येथील मुलीच्या बेपत्ता प्रकरणात (Missing Girl) पोलिसांवर हलकर्जीपणाचा ठपका ठेवत, अमरावती पोलीस आयुक्तांवर (Amravati Police Commissioner) तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी केली आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे यांचे सरकार होते. त्याकाळात काही गोष्टी चालून गेल्या. आता देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे. त्यामुळे अशा गोष्टींना खतपाणी घालणाऱ्यांवर कारवाई होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान बेपत्ता मुलगी साताऱ्यात सापडली आहे. पोलिसांच्या मदतीने आपण त्या मुलीशी बोलो, ती सुखरुप असल्याचा दावा खा. राणा यांनी केला. तसेच असे प्रकार वरचेवर वाढत असतानाही पोलीस कारवाई करत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. पोलिसांच्या हलगर्जीपणा झाल्याने पोलीस आयुक्तांवर कारवाई झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

Published on: Sep 08, 2022 02:21 PM