पुण्यात बनावट पनीर तयार करणाऱ्यांवर कारखान्यावर छापा
पुण्यातील वानवडी येथील बनावट पनीर तयार करणाऱ्या कारखान्यावर एफडीएकडून कारवाई करण्यात आली आहे. टिपटॉप डेअरी प्रॉडक्टस या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कारखान्यावर एफडीएने छापा टाकला आहे. या छाप्यात 800 किलो बनावट पनीर तयार करून ठेवल्याचे आढळून आले असून कारवाईनंतर मात्र ते नष्ट करण्यात आले आहे.
पुण्यातील वानवडी येथील बनावट पनीर तयार करणाऱ्या कारखान्यावर एफडीएकडून कारवाई करण्यात आली आहे. टिपटॉप डेअरी प्रॉडक्टस या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कारखान्यावर एफडीएने छापा टाकला आहे. या छाप्यात 800 किलो बनावट पनीर तयार करून ठेवल्याचे आढळून आले असून कारवाईनंतर मात्र ते नष्ट करण्यात आले आहे. हे पनीर तयार करण्यासाठी 350 किलो स्किम्ड मिल्क पावडर व 270 किलो पामोलिन तेल साठविल्याचेही आढळून आले आहे. या साठ्यातून तपासणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. त्याची किंमत 1 लाख 67 हजार 790 रूपये किमतीचे असून 799 किलो पनीर, 1 लाख 21 हजार 800 रूपये किंमतीचे ३४८ किलो स्किम्ड मिल्क पावडर, 39 हजार 664 रूपये किमतीचे 268 किलो आरबीडी पामोलीन तेल असा एकूण 3 लाख 29 हजार 254 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.