Abdul Sattar : पंचनाम्याकडं दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा इशारा
सत्तार म्हणाले, नुकसान झालेला एकही शेतकरी वंचित राहणार नाही. कोणत्याही अधिकाऱ्याने पंचनाम्याबाबत भेदभाव आणि पक्षपात करत असेल. लोकांची अडवणूक करत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल.
वर्धा : शेतकऱ्यांच्या पंचांनाम्याबाबत कर्मचारी अधिकारी दुर्लक्ष करत असतील तर निश्चित त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला. कृषीमंत्री विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. वर्धा येथे ते बोलत होते. ते म्हणाले, शेतामध्ये जाताना अडचणी आहेत. ज्या ठिकाणी जाता येणार नाही त्या ठिकाणी ड्रोन सर्वे आणि सॅटेलाईट सर्वेच रिपोर्ट एकत्रित केला जाईल. बोगस पंचनामे होणार नाही. सत्य लपविले जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. सत्तार म्हणाले, नुकसान झालेला एकही शेतकरी वंचित राहणार नाही. कोणत्याही अधिकाऱ्याने पंचनाम्याबाबत भेदभाव आणि पक्षपात करत असेल. लोकांची अडवणूक करत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल. सध्या अधिवेशन सुरु आहे. तीन दिवस अधिवेशनाला सुट्टी असल्याने या तीन दिवसांत तीन विभाग आणि सात जिल्ह्यांचा दौरा घेतलेला आहे, असंही त्यांनी सांगितलं.