जळगावात शिंदे गटाचा खळळखट्याक! बजाज फायनान्स कंपनीचं कार्यालयाचं फोडलं
बजाज फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या पर्सनल लोनचा एक हप्ता थकल्याने कंपनीने वसूलीसाठी गुंड प्रवृत्ती वापरली. त्यावर शिंदे गटाने थेट रिअॅक्शन देत अॅक्शनच दाखवली
जळगाव : राज्यात खरी शिवसेना कोणाची यावर सध्या जोरदार ठाकरे गटात आणि शिंदे गटात लागली असतानाच. जळगावात मात्र शिंदे गटाने खळळखट्याक केलं आहे. शिंदे गटाने कर्जाच्या हफ्त्यावरून मुजोरी करणाऱ्या कंपनीला चांगलाच इंगा दाखवत कंपनीचे कार्यालयचं फोडलं. त्यामुळे सध्या शिंदे गटाची चर्चा जळगावात सुरू आहे.
बजाज फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या पर्सनल लोनचा एक हप्ता थकल्याने कंपनीने वसूलीसाठी गुंड प्रवृत्ती वापरली. त्यावर शिंदे गटाने थेट रिअॅक्शन देत अॅक्शनच दाखवली. बाळासाहेबांची शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी बजाज फायनान्सच्या कार्यालयाची तोडफोड केली. ही तोडफोड मंगळवारी सायंकाळी अंमळनेर शहरात झाली.
तालुका प्रमुख प्रथमेश पवार यांनी बजाज फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. त्यांचा पर्सनल लोनचा एक हफ्ता थकल्याने बजाज फायनान्सचे कर्मचारी त्यांच्या घरी गेले होते. त्यांनी तेथे दादागिरी केली. अशीच दादागिरी त्यांनी इतर शेतकऱ्यांवर केल्याच्याही तक्रारी येत होत्या.
त्यावरून शिंदे गटाचे संतप्त पदाधिकार्यांनी अमळनेर शहरातील बजाज फायनान्स कार्यालयाची तोडफोड केली. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते