कार्यकर्ते म्हणाले मुख्यमंत्री व्हावं लागेल, पंकज मुंडे याचं उत्तर ‘माझी पंचाईत…’
फुले उधळून पंकज मुंडे यांचे स्वागत केले. तोच धागा पकडून त्या म्हणाल्या, भाषणासाठी माझ्यात जीव नाही. जेवले नाही. बकऱ्यासारखं आम्हाला सजवतात. २-३ किलो पोटात फुल निघतील. जेबीसी स्टाईल आमच्या बीडची. फुलांच्या माऱ्याने तोंड सुजलं, अशी कोटी त्यांनी केली.
सातारा : 6 सप्टेंबर 2023 | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची शिव परिक्रमा यात्रा आज सातारा येथे पोहोचली. यावेळी कार्यकर्त्यांनी फुले उधळून त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना पंकज मुंडे यांनी माझ्यावर लोक प्रेमाने फुले टाकत आहेत. तुमचं प्रेम माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. या गावातील कमानीला तुम्ही गोपीनाथ मुंडे यांचे नाव दिलं आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत तुमच्या हदय़ावर माझं नाव कोरायचं असेल तर काय करावं लागेल. असा सवाल त्यांनी केला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना ‘तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावं लागेल’ असं म्हटलं. त्यावर पंकज मुंडे यांनी ‘परत माझी पंचाईत तुम्ही करत आहात.’ मी खासदार आहे का? मी आमदार आहे का ? माझ्यासाठी तुम्ही का जमू लागला आहात. मला तुमची सेवा करायची आहे. असे म्हणत कार्यकर्त्यांची समजूत काढली. ताई तुम्ही नाराज आहे असे अनेक हितंचिंतक विचारतात. पण, माझ्या चेहऱ्यावर काही दिसत का? असा सवालही त्यांनी केला.