Santosh Deshmukh Case : अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अभिनेता अमीर खान याने नुकतीच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि मुलगा विराज देशमुख यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.
अभिनेता अमीर खान याने संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची भेट घेतली आहे. यावेळी संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख देखील उपस्थित होता. पुण्यात पाणी फाउंडेशनचा कार्यक्रम नुकताच पार पडला आहे. या कार्यक्रमात अमीरने धनंजय देशमुख यांची भेट घेतली आहे.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 3 महिन्यापूर्वी खंडणीच्या वादातून निर्घृणपणे हत्या झाली होती. या प्रकरणाचा मास्टर माइंड समजला जाणार वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याने या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे. या घटनेतील सर्व 8 आरोपींवर मकोका लावण्यात आलेला आहे. तर कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा खटला सध्या बीड न्यायालयात सुरू आहे. याच संदर्भात अमीर खान याने धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा केली आहे. पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात अमीरने धनंजय देशमुख आणि विराज देशमुख यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.