Anupam Kher : अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
विख्यात अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'दि ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या चित्रपटात अनुपम खेर यांनी डॉ. मनमोहन सिंग यांची भूमिका साकारली होती.
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे गुरूवारी रात्री ( 26 डिसेंबर) दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. विख्यात अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘दि ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटात अनुपम खेर यांनी डॉ. मनमोहन सिंग यांची भूमिका साकारली होती. माजी पंतप्रधानांच्या निधनाबद्दल अनुपम खेर यांनी शोक व्यक्त केला.
डॉ.मनमोहन सिंग हे खूप चांगले व्यक्ती होते. ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा चित्रपट जेव्हा मला ऑफर करण्यात आला तेव्हा मी हा चित्रपट करण्यास नकार दिला. कदाचित मी ही भूमिका केली तर लोक म्हणतील की मी त्यांची थट्टा करण्यासाठी हे काम केलं असा आरोप लोक करतील असं मला वाटलं होतं. मात्र माझ्या आयुष्यातील तीन भूमिकांपैकी मी जे पात्र मनापासून साकारले ते डॉ. मनमोहन सिंग यांचं होतं, असं म्हणत अनुपम खेर यांनी नमूद केलं.