Saif Ali Khan Attacked | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. सैफ-करीनाच्या वांद्रे येथील घरात मध्यरात्री 3 च्या सुमारास एक चोर शिरला. नोकरांना जाग आली , त्यांनी आरडाओरडा केला . त्यामुळे सैफलाही जाग आली, त्याने चोराला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यात झटापट झाली आणि चोराने सैफवर चाकूने हल्ला केला
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. सैफ-करीनाच्या वांद्रे येथील घरात मध्यरात्री 3 च्या सुमारास एक चोर शिरला. नोकरांना जाग आली , त्यांनी आरडाओरडा केला . त्यामुळे सैफलाही जाग आली, त्याने चोराला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यात झटापट झाली आणि चोराने सैफवर चाकूने हल्ला केला. याप्रकरणी वांद्रे पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळे टीम्स बनवले आहेत. सैफ अली खानला तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी दिली.
“सैफला मध्यरात्री 3.30 वाजताच्या सुमारास लिलावती रुग्णालयात आणलं गेलं. त्याच्या शरीरावर एकूण सहा जखमा होत्या आणि त्यापैकी दोन खोलवर झाल्या आहेत. एक जखम त्याच्या पाठीच्या कण्याजवळ झाली आहे. आम्ही त्याच्यावर उपचार करत आहोत. न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि ॲनेस्थेटिस्ट निशा गांधी त्याच्यावर उपचार करत आहेत. सैफवर सर्जरी झाल्यानंतरच आम्ही अधिक माहिती देऊ शकू”, असं लिलावती रुग्णालयाचे सीईओ नीरज उत्तमणी यांनी स्पष्ट केलं.