बाप्पा..! सर्वांना सुखी आणि आनंद ठेव
संकटकाळात कलाकार आणि तंत्रज्ञ लोकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले होते, त्यातून सावरण्याचं बळ बाप्पा सर्वांना देईल असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री दिव्या दत्ता हिनेही आपल्या नव्या घरात बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर तिने सांगतिले की, कोरोना संकटानंतर यंदा गणपती बाप्पा मोठ्या आनंदाने येथे आले आहेत. त्यामुळे आपल्या घरासह सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. दिव्या दत्ताने सांगितले की, माझ्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो. त्यानिमित्ताने जवळचे नातेवाईक, मित्र मंडळी आपल्या घराला भेट देत असतात. त्यामुळेही आनंदी वातावरण हे असतेच. दिव्या दत्ताने यावर्षीच्या गणेशोत्सव खास आहे असल्याचे म्हटले आहे, गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून भारतावर आणि भारतीय चित्रपटसृष्टीवर मोठे संकट आले होते, आता हे संकट दूर होत आहे. या संकटकाळात कलाकार आणि तंत्रज्ञ लोकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले होते, त्यातून सावरण्याचं बळ बाप्पा सर्वांना देईल असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.