चित्रा वाघ यांचा तिळतिळाट करणारा उर्फीचं ट्वीट म्हणाली, ‘...अशी कशी गं तू सास…’

चित्रा वाघ यांचा तिळतिळाट करणारा उर्फीचं ट्वीट म्हणाली, ‘…अशी कशी गं तू सास…’

| Updated on: Jan 10, 2023 | 5:38 PM

याच्या आधी देखील उर्फीने चित्रा यांचा उल्लेख माझी सासू म्हणून केला होता. तर कधी आम्ही चांगल्या मैत्रीण होऊ असं म्हटलं होतं. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले.

मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री, मॉडेल ऊर्फी जावेद यांच्यातील वाद हा दिवसेंदिवस वाढतच आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीवर कपड्यांवरून डिवचण्याचे सुरूच ठेवले आहे. तर उर्फीने देखिल पलटवार करताना ट्वीट कारणामा सुरूच ठेवला आहे. आता देखिल ऊर्फीने एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये तिने चित्रा वाघ यांचा चिमटा काढला आहे. सध्या उर्फीचे हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

उर्फीने ट्विट करत, ‘उर्फी जावेदला दिला त्रास… चित्रा अशी कशी गं तू सास…’ असं म्हटलं आहे. उत्तानपणे नंगटपणा करणाऱ्या या बाईला रोखण्यासाठी पोलिसांकडे कायदे आहेत की नाही? असं म्हणत चित्रा वाघ ऊर्फीच्या अटकेची मागणी केली होती. त्यानंतर उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचण्यासाठी अनेक ट्वीट केले होते.

याच्या आधी देखील उर्फीने चित्रा यांचा उल्लेख माझी सासू म्हणून केला होता. तर कधी आम्ही चांगल्या मैत्रीण होऊ असं म्हटलं होतं. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले. आताही तिने ‘मेरी डीपी धांसू, चित्रा मेरी सासू’ असं म्हणत चित्रा वाघ यांना डिवचलं आहे.

Published on: Jan 10, 2023 02:40 PM