संजय राठोड यांना विसरलात का? त्यामुळेच एवढा हल्लाबोल; उर्फीचा चित्रा वाघ यांना उत्तर
अभिनेत्री उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यात टि्वटर वॉर पहायला मिळत आहे. चित्रा वाघ यांनी समाजात वावरताना आपला पेहराव व्यवस्थित राखणं हे सामाजिक भान आहे असं म्हटल्यानंतर उर्फीने ट्वीटरवर रिप्लाय दिला आहे.
मुंबई : हटके फॅशन आणि कपड्यांमुळे अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती समाज माध्यमांवर चर्चेचा विषय झाली आहे. तिच्या हटके फॅशन आणि कपड्यांमुळे तिच्यावर मुंबईतील महिला स्वयंसेवी संस्थेने महिला आयोगाला तक्रार केली आहे. तर भाजप महिलाआघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी समाजात वावरताना आपला पेहराव व्यवस्थित राखणं हे सामाजिक भान आहे. पण सामाजिक भानच राखलं जात नसेल तर त्याला नंगट मानसिकता का म्हणू नये, असा सवाल केला आहे.
यानंतर आता या वादाला नवाच ट्वीस्ट पहायला मिळत असून अभिनेत्री उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यात टि्वटर वॉर पहायला मिळत आहे. चित्रा वाघ यांनी समाजात वावरताना आपला पेहराव व्यवस्थित राखणं हे सामाजिक भान आहे असं म्हटल्यानंतर उर्फीने ट्वीटरवर रिप्लाय दिला आहे.
चित्रा वाघ यांच्या ट्वीटवर रिप्लाय देत उर्फी जावेदने माझा भाजपमध्ये प्रवेश झाल्यास वाघ या माझ्या चांगल्या मैत्रीण होतील असंही उर्फी जावेदने म्हटलं आहे. त्याचबरोबर उर्फीने चित्राताई तुम्हाला संजय राठोड आठवतात का असाही सवाल केला आहे.
त्याचबरोबर भाजपबरोबर युती केल्यानंतर तुमची आणि संजय राठोड यांची चागली मैत्री झाल्याचेही तिनं म्हटलं आहे. तर संजय राठोडांच्या सर्व चुका विसरल्यानेच तुम्ही एवढा हल्लाबोल केल्याचेही उर्फीने वाघ यांना टोला लगावला आहे