Uorfi Javed Tweet | 'मी आणि चित्रू लवकरच चांगल्या मैत्रिणी होणार' : उर्फी जावेद

Uorfi Javed Tweet | ‘मी आणि चित्रू लवकरच चांगल्या मैत्रिणी होणार’ : उर्फी जावेद

| Updated on: Jan 04, 2023 | 8:09 PM

उर्फीच्या बोल्ड कपड्यांविरोधात चित्रा वाघ यांनी आवाज उठवला आहे. त्यावरून उर्फी आणि वाघ यांच्यात जोरदार वाक युद्ध रंगलेलं दिसत आहे

मुंबई : सध्या राज्यात अनेक वाद समोर येत आहेत. याचदरम्यान अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांच्यात देखिल जुगलबंदी पहायला मिळत आहे. चित्रा वाघ यांनी केलेल्या वक्तव्यानंतर उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचले आहे. तसेच मी आणि चित्रू लवकरच चांगल्या मैत्रिणी होऊ असे म्हणत वाघ यांचा चिमटा काढला आहे.

उर्फीच्या बोल्ड कपड्यांविरोधात चित्रा वाघ यांनी आवाज उठवला आहे. त्यावरून उर्फी आणि वाघ यांच्यात जोरदार वाक युद्ध रंगलेलं दिसत आहे. तसेच ट्वीटरवरही दोघे भिडल्याचे पहायला मिळत आहे.

आताही उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचले आहे. तसेच ट्वीट करत मी आणि चित्रू लवकरच चांगल्या मैत्रिणी होणार’ असल्याचे उर्फीने म्हटलं आहे.

Published on: Jan 04, 2023 08:09 PM