आदित्य ठाकरे यांच्या सभेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त, पाहा कशी असेल सुरक्षा व्यवस्था

आदित्य ठाकरे यांच्या सभेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त, पाहा कशी असेल सुरक्षा व्यवस्था

| Updated on: Feb 09, 2023 | 11:46 AM

आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबादच्या या सभेसाठी औरंगाबाद पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांच्या सभेवेळी चोख बंदोबस्त असणार आहे. पाहा...

औरंगाबाद : शिवसेना ठाकरेगटाचे नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांची औरंगाबादला सभा होतेय. आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबादच्या या सभेसाठी औरंगाबाद पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन गावात होतेय आदित्य ठाकरे यांची सभा आहे. या सभेसाठी 200 पोलीस आणि 25 अधिकाऱ्यांचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. औरंगाबादचे पोलीस आयुक्त मनीष कलवानिया आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी सकाळपासून बिडकीन गावात तळ ठोकून आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि डीवायसपी सभास्थळावर आहेत. आदित्य ठाकरे यांच्या सभेवेळी चारही बाजूने कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे.

Published on: Feb 09, 2023 11:46 AM