Video : राज ठाकरेंआधी आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा- सूत्र

Video : राज ठाकरेंआधी आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा- सूत्र

| Updated on: Apr 17, 2022 | 5:59 PM

नव्वदच्या दशकापासून अयोध्या हे नेहमीच चर्चेत राहिलं आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेल्या देशव्यापी रथ यात्रेमुळे आधी अयोध्या चर्चेत आलं. त्यानंतर बाबरी मशीद पाडल्यानंतर अयोध्या चर्चेत आलं. त्यानंतर कोर्टात सुरू असलेला खटला आणि त्यावर आलेला निकाल यामुळे पुन्हा अयोध्येची चर्चा सुरू झाली. मध्यंतरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला भेट […]

नव्वदच्या दशकापासून अयोध्या हे नेहमीच चर्चेत राहिलं आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेल्या देशव्यापी रथ यात्रेमुळे आधी अयोध्या चर्चेत आलं. त्यानंतर बाबरी मशीद पाडल्यानंतर अयोध्या चर्चेत आलं. त्यानंतर कोर्टात सुरू असलेला खटला आणि त्यावर आलेला निकाल यामुळे पुन्हा अयोध्येची चर्चा सुरू झाली. मध्यंतरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला भेट दिली आणि पुन्हा अयोध्या चर्चेत आलं. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली आहे. तर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेही  (aaditya thackeray)  अयोध्येला जाणार आहे. उत्तर भारतातील हिंदुत्ववादी (Hindutva Politics) नेत्यांचं अयोध्या हे केंद्र होतं. आता महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी नेत्यांचंही अयोध्या केंद्र होताना दिसात आहे.