आमच्या नावाने ‘हे’ आमदार येतात गैरसमज दूर केला; मुनंगटीवार यांचा कोणाला टोला
ठाकरे पिता पुत्राच्या वर्तणुकीला कंटाळून हे आमदार बाहेर पडले आहेत. ते परत कशाला तुमच्या दारात येतील. ते दूर दूर पर्यंत येणार नाहीत
नागपूर : आदित्य ठाकरे यांनी भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि त्यांच्या आमदारांवर टीका केली होती. खोके सरकार फार काळ टिकणार नाही, तर शिंदे बरोबर गेलेल्या आमदारांना भाजप सोबत ठेवणार नाही असं म्हटलं होतं. त्या टीकेवर भाजप नेते कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पलटवार करत, हे फक्त शिंदे गटांच्या आमदाराच्या मनात चलबिचल करण्यासाठी केलं जात आहे. उलट ठाकरे पिता पुत्राच्या वर्तणुकीला कंटाळून हे आमदार बाहेर पडले आहेत. ते परत कशाला तुमच्या दारात येतील. ते दूर दूर पर्यंत येणार नाहीत. त्या आमदारांशी योग्य वर्तणूक केली नाही. आम्ही खूप मोठे आहोत आमच्या नावाने हे आमदार येतात हा गैरसमज या 40 आमदारांनी दूर केला. कधी कधी 50 लक्ष रुपयाचा हिऱ्याचा दागिरा सुद्धा दहा रुपयाचा आरसा नसेल तर महत्वाचा ठरत नाही असे म्हणत आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली.
Published on: Mar 13, 2023 11:26 AM
Latest Videos