उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त, आदित्य ठाकरे ‘शेंबडं पोरगं’; भाजप नेत्याची सडकून टीका
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाज काढत टीका केली होती त्यावरून प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे
सातारा : पहिल्याचं पावसाने मुंबई तुंबल्यानं ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाज काढली होती. तसेच त्यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे. त्यांनी जे उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षात जमलं नाही ते शिंदे-फडणवीस सरकारनं करून दाखवलं. त्यामुळे उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. तर आता मुख्यमंत्री शिंदे यांची लाज आदित्य ठाकरे काढतो. त्याचा जीव केवढा त्याचं वय काय? शेंबड्या पोराने मुख्यमंत्र्यांची लायकी काढणे महाराष्ट्रात कधीच झालं नव्हतं असं बोलत त्यांनी आदित्य ठाकरे यांचा समाचार घेतला आहे. यावरून आता ठाकरे गट किंवा आदित्य ठाकरे कोणता पलटवार करणार काय टीका करणार हे पहावं लागणार आहे.
Published on: Jun 26, 2023 10:42 AM
Latest Videos