मिंधे-फडणवीस सरकारच्या धोरणांवर अहंकाराचा प्रभाव दिसतो, दूरदर्शीपणाचा नाही; आदित्य ठाकरेंची टीका

मिंधे-फडणवीस सरकारच्या धोरणांवर अहंकाराचा प्रभाव दिसतो, दूरदर्शीपणाचा नाही; आदित्य ठाकरेंची टीका

| Updated on: Apr 26, 2023 | 2:32 PM

केवळ कोकणच नाही तर राज्याच्या विविध जिल्ह्यात मिंधे-फडणवीस सरकार जनतेचं मत जाणून न घेता आणि अहंकारापोटी केवळ प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मुंबई : शिवसेना आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. यावेळी त्यांनी कोकणातील रिफायनरी प्रकल्पावरून सरकारला एकदा लक्ष्य करताना टीका केली आहे. केवळ कोकणच नाही तर राज्याच्या विविध जिल्ह्यात मिंधे-फडणवीस सरकार जनतेचं मत जाणून न घेता आणि अहंकारापोटी केवळ प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. ही टीका त्यांनी ट्विट करत केली आहे. तर आपल्या या ट्विटमध्ये त्यांनी ‘आरे, मुंबई – अजनी वन, नागपूर – बारसू, रत्नागिरी – पांजरपोळ, नाशिक – पटवर्धन पार्क, मुंबई – पुणे रिव्हरफ्रंट विकास – वेताळ टेकडी, पुणे- वरडा गाव (कोळसा वॉशरीज), नागपूर या प्रकल्पांचे नाव घेत सरकारवर टीका केली आहे. तसेच या प्रकल्पात काय साम्य आहे?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तर उत्तर देताना, असे सरकार (मिंधे+भाजपचे) जे संवाद साधत नाही आणि नागरिकांचं म्हणणं मांडण्याचा हक्क त्यांना देण्यावर त्यांचा विश्वास नाही. शिंदे-फडणवीस सरकारचा धोरणांवर अहंकाराचा प्रभाव दिसतो, दूरदर्शीपणाचा नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.

Published on: Apr 26, 2023 02:32 PM