राजकारणात निर्लज्जपणा वाढलायः आदित्य ठाकरे

राजकारणात निर्लज्जपणा वाढलायः आदित्य ठाकरे

| Updated on: Sep 03, 2022 | 9:51 AM

येत्या काही दिवसात जे शिवसेनेचा दसरा मेळावा आपला आहे असा दावा दाखल करताहेत त्यांचाही मुखवटा फाटल्याशिवाय राहणार असंही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील बंडखोरी नाट्यानंतर शिवसेना नेमकी कोणाची हा वाद रंगलेला असतानाच आता अनेक वर्षांपासून होणाऱ्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यावर आता शिंदे गटाकडून दावा केला जात आहे. त्यामुळे खरी शिवसेना आणि शिंदे गटाची शिवसेना हा वाद आता टोकाला जाण्याची शक्यता आहे. या दसरा मेळाव्याविषयी बोलताना आदित्य ठाकरे यांनी मात्र शिंदे गटाच्या राजकारणामुळे आता निर्लज्जपणा वाढला असल्याची टीकाही त्यांनी केली. बंडखोरी नाट्य नंतर शिवसेनेवर आपली निष्ठा आहे, ठाकरे घराण्यावर आपली श्रद्धा आहे असं म्हणणाऱ्यांचे बुरखे फाटले आहेत, त्यामुळे येत्या काही दिवसात जे शिवसेनेचा दसरा मेळावा आपला आहे असा दावा दाखल करताहेत त्यांचाही मुखवटा फाटल्याशिवाय राहणार असंही त्यांनी यावेळी सांगितले. आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्यांचे नाव घेतले नाही मात्र असा निर्लज्जपणा कोणी केला नाही अशी बोचरी टीकाही त्यांनी शिंदे गटावर केली आहे.

Published on: Sep 03, 2022 09:32 AM