‘हरकत नाही, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना जाग…’, आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका
VIDEO | मुंबईतील बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ट्वीट करत जोरदार हल्लाबोल
मुंबई, ८ ऑगस्ट २०२३ | गेल्या ५ ते ६ दिवसांपासून मुंबईत बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सलग ५ दिवस कंत्राटी कर्मचारी विविध मागण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. दरम्यान मध्यरात्री १ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भेटीनंतर कर्मचाऱी आपला बेमुदत संप मागे घेणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशातच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘काल मी पत्रकार परिषदेत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, त्यांच्या मागण्या आणि मुंबईकरांना होणारा त्रास हा मुद्दा मांडल्यावर इतके दिवस आत्मस्तुतीत मग्न असलेले मुख्यमंत्री अचानक जागे झाले आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना भेटायला गेले. हरकत नाही, ह्यामुळे का होईना घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना जाग येऊन बेस्टचा संप मिटणार असेल आणि मुंबईकरांच्या अडचणी कमी होणार असतील तर चांगलंच आहे!’