दादा भुसेंकडून आदित्य ठाकरेंचा उल्लेख छोटे युवराज; म्हणाले, हे सुद्धा तसचं...

दादा भुसेंकडून आदित्य ठाकरेंचा उल्लेख छोटे युवराज; म्हणाले, हे सुद्धा तसचं…

| Updated on: Apr 14, 2023 | 12:27 PM

नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी आदित्य ठाकरे यांचा हा केविलवाणा प्रयत्न सुरू असून हा फक्त बालिशपणा असल्याचं म्हटलं आहे

नाशिक : आदित्य ठाकरे यांनी शिंदे हे मातोश्रीवर येऊन रडले, असा दावा केला. त्यावर आता शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. हाच धागा धरत नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी आदित्य ठाकरे यांचा हा केविलवाणा प्रयत्न सुरू असून हा फक्त बालिशपणा असल्याचं म्हटलं आहे. तर आपले छोटे युवराज हे राहुल गाधींची स्टाईल मारत आहेत. ते सुद्धा देशाच्या बाहेर जाऊन पंतप्रधान मोदी यांची बदमानी करतात. आता हे करत आहेत. हा फक्त मविआच्या संगतीचा परिणाम असल्याची टीका त्यांनी केली आहे.

Published on: Apr 14, 2023 12:27 PM