Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी एकाच वाक्यात नारायण राणे यांचा विषय संपवला, म्हणाले, ‘सोळा वर्ष टीका….’
मिंधे सरकारमधील लोक थापा मारून कुठेही जाऊ शकतात. परंतु, आम्ही छत्रपती संभाजीनगरमधील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जात आहोत. देशाचे स्वातंत्र्य आणि संविधानाचे संरक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. NDA आधी कुठे एकत्र अशी भेटली नव्हती. त्याचे परिणाम आपण पाहिलंत. पण, देशभरात इंडिया आघाडीसाठी आम्ही एकत्र येऊन पुढे जात आहोत.
मुंबई : 14 सप्टेंबर 2023 | युवासेनाप्रमुख आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी लोअर परेल ब्रिजची पाहणी केली. गणपतीचे आगमन येण्यापूर्वी आधी लोअर परेल ब्रिज सुरू करा अन्यथा गणरायाचे चरण स्पर्श करून या ब्रिजची सुरुवात करणार असा इशारा त्यांनी यावेळी दिला. सरकारमध्ये असताना आम्ही ब्रिजसाठी सतत पाठपुरावा करत होतो. सहा महिन्यापूर्वी हा रोड महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाला. खडी घोटाळा झाला नसता तर हा ब्रिज दोन्ही बाजूंनी तयार झाला असता असे त्यांनी सांगितले. आमदार अपात्रतेबाबतची सुनावणी दीड वर्षापासून सुरू आहे. पण, आता त्यात ढिलेपणा होऊ नये. हा लोकशाही बद्दलचा विषय आहे. घटनाबाह्य सरकार, गुंडगिरी करणारे सरकार आपल्या डोक्यावर लादले गेले आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले असले तरी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने पूर्ण केल्या पाहिजेत. तिथे लाठीचार्ज झाला त्या लाठीचार्ज मागील जनरल डायर नक्की कोण आहे याचाही खुलासा व्हावा अशी मागणी त्यांनी केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. याबद्दल त्यांना विचारले असता त्यांच्यावर काय बोलायचं? ‘सोळा वर्ष आमच्यावर टीका करायला पगार मिळाला’ या एका वाक्यात आदित्य ठाकरे यांनी नारायण राणे यांचा विषय संपवला.