आदित्य ठाकरे यांच्या ‘त्या’ कृतीवरून पुन्हा आठवली ‘हनुमान चालीसा’, पहा नेमकं काय केलं…
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालिसावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसाचे पठण करण्याचा इशारा दिला. त्यावरून राज्यात एकच राजकीय रणकंदन माजले होते.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात ”हनुमान चालीसा’च्या मुद्द्यावरून राज्यातले राजकारण तापले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मस्जिदीवरील भोंगे बंद झाले नाही तर मस्जिदीबाहेर हनुमान चाळीस पठण करू असा इशारा राज्य सरकारला दिला होता. राज ठाकरे यांच्या या इशाऱ्यानंतर राज्यात ठिकठिकाणी मस्जिदीबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. भाजपनेही या आंदोलनात उडी घेतली होती. तर, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालिसावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसाचे पठण करण्याचा इशारा दिला. त्यावरून राज्यात एकच राजकीय रणकंदन माजले होते. नवनीत राणा याना अटक करण्यात आली होती. सरकार बदलल्यानंतर मात्र हा मुद्दा मागे पडला. परंतु, आज महापालिकेवर मोर्चा काढण्यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी मेट्रो सिनेमाजवळील मंदिरात जाऊन हनुमानाच्या मूर्तीवर तेल, तीळ वाहिले. मनोभावे पूजा केली. आदित्य ठाकरे यांनी ‘त्या’ कृतीमुळे काही क्षण हनुमान चालीसावरून सुरु झालेले ‘ते’ राजकारण आठवले.