VIDEO | बाहेरचाच इंपोर्टेड माल! भाजपला काय मिळालं? गडकरींच्या वक्तव्यावरून आदित्य ठाकरे यांचा टोला
केंद्रीय मंत्री व भाजपा नेते नितीन गडकरी यांचे भाजपच्या बाबात सध्या केललं वक्तव्य चांगलेच गाजत आहे. त्यांनी आमचं दुकान चांगलं सुरू आहे. मात्र येथे जुने गिऱ्हाईक कुठे दिसेनात असं म्हटलं आहे. सध्या यावरून जोरदार चर्चा रंगली आहे.
मुंबई : 19 ऑगस्ट 2023 | केंद्रीय मंत्री व भाजपा नेते नितीन गडकरी यांनी भाजपच्या बुलडाणा येथील कार्यकर्मात एक मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांनी आमचं दुकान चांगलं सुरू आहे. तर सध्या आमच्या दुकानात गिऱ्हाईकांची कमी देखील नाही, मात्र, जुने गिऱ्हाईक दिसेनात असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या म्हणण्याप्रमाणे भाजपमध्ये सत्तर टक्के लोकं आता ड्यूप्लिकेट् आहेत. यावरूनच ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाना साधला आहे. भाजपने राज्यात दोन पक्ष आणि एक कुटुंब फोडलं. सत्ता स्थापन केली. मात्र यात त्यांचे किती मंत्री आहेत. पाच किंवा सहा. हे घटनाबाह्य शिंदे-फडणवीस-पवार सरकार आहे. त्याच्यात भाजपला काय मिळालं स्वतःचे चांगले नेते ज्यांनी पक्षासाठी पंचवीस तीस वर्ष मेहनत केली त्यांना काय मिळालं? महाराष्ट्राला मागे नेत भाजपला काय मिळालं? याचा विचार भाजपचे कार्यकर्ते कधी ना कधीतरी करतील असे देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.