VIDEO | ‘सरकार निवडणुकांना घाबरतयं? डरपोक मुख्यमंत्री’; आदित्य ठाकरे यांची खोचक टीका

VIDEO | ‘सरकार निवडणुकांना घाबरतयं? डरपोक मुख्यमंत्री’; आदित्य ठाकरे यांची खोचक टीका

| Updated on: Aug 19, 2023 | 1:02 PM

राज्याचं राजकारण आज दोन गोष्टींमुळे चांगलेच तापलेलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सामनातून टीका आणि मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित झाल्याने राजकारण जोरदार तापलेलं आहे.

मुंबई : 19 ऑगस्ट 2023 | राज्याच्या राजकारण आजचा दिवस तापलेला दिसत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठाकरे गटाचे मुखपत्र दैनिक सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. तर मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक रद्द झाल्याने देखील ठाकरे गट आणि मनसे आक्रमक झाली आहे. याचदरम्यान सिनेट निवडणुकीवरून ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्यातच जुंपलेली पाहायला मिळत आहे. यादरम्यान आदित्य ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्या टीकेला नजर अंदाज करत शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केलं आहे. त्यांनी अशी निवडणूक स्थगित करणे हे अतिशय धोकादायक आहे. कारण आज ही झाली उद्या लोकसभेच्या देखील निवडणूका स्थगित केल्या जातील. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे डरपोक मुख्यमंत्री आहेत. ते डरपोक आहेत हे आता भाजपला पण पटलेले आहे. तर भाजपने एका डरपोक माणसाला घेतलेलं आहे. हे सरकार निवडणुकांना का घाबरताय? असा सवाल केला आहे.

Published on: Aug 19, 2023 01:02 PM