‘…ज्या मिनिटाला सरकार आलं त्या मिनिटाला’; आदित्य ठाकरे यांनी टोलनाक्यावरून स्पष्टच सांगितलं
ठाकरे गटाकडून यावरून राज्य सरकारला तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली जात आहे. याचमुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर टीका करताना, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मुंबईच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही.
मुंबई, 7 ऑगस्ट 2023 | मुंबईतील रस्त्यावरून सध्या राज्य सरकार विरोधात ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाकडून यावरून राज्य सरकारला तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली जात आहे. याचमुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर टीका करताना, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मुंबईच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. ते अमित शाह यांना खूश करण्यात लागले आहेत. तर त्यांनी हिंमत असेल आणि खरंच ठेकेदार मित्र नसतील तर ते टोलनाके बंद करावेत असे आव्हान दिलं आहे. त्याचबरोबर मुंबईतील टोलनाक्यांविरोधात आपल्याला आंदोलन करायचं नाही हे स्पष्ट करताना. आमचं लवकरच सरकार बनणार आणि ज्या मिनिटाला आमचं सरकार बनणार त्यावेळी मुंबईकरांसाठी आणि लाखो लोकं जे मुंबईत काम करतात. त्यांच्या हितासाठी त्या मिनिटाला आम्ही हा टोल बंद करू असे आश्वस्त करू असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.