आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठं विधान, म्हणाले…
याचदरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तारावरून तर राष्ट्रवादीच्या खात्यात मंत्री पदे गेल्याने शिंदे गटासह भाजपच्या आमदारांची नाराजी उघड होताना दिसत आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिंदे-फडणवीस सरकारमधील प्रवेशाने भाजपसह शिंदे गटातील काही आमदार नाराज झाले आहेत. त्यावरून वेगवघल्या चर्चांना उत आला आहे. याचदरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तारावरून तर राष्ट्रवादीच्या खात्यात मंत्री पदे गेल्याने शिंदे गटासह भाजपच्या आमदारांची नाराजी उघड होताना दिसत आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी शिंदे यांच्याबाबत बोलताना, शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास सांगितलंय, असं आपल्या ऐकण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात गोंधळ उडाला आहे. तर यावेळी त्यांनी, आमचे आमदार परत येत आहेत. त्याबाबत इकडून तिकडून निरोप येत आहेत. तर सध्या राज्याच्या राजकारणात स्वार्थी विरूद्ध प्रामाणीक असा लढा सुरू असल्याचं म्हटलं होतं.