Aaditya Thackeray | 'नवीन वर्ष साजरं करा, त्यांना टेन्शन देऊ नका' आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर टीका

Aaditya Thackeray | ‘नवीन वर्ष साजरं करा, त्यांना टेन्शन देऊ नका’ आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर टीका

| Updated on: Jan 03, 2023 | 7:34 PM

सिनेटच्या बैठकीला आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. तसेच शिंदे गटावर निशाना साधताना नवीन वर्ष साजरं करा, त्यांना टेन्शन देऊ नका असं म्हटलं आहे.

मुंबई : नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाना साधला. तसेच त्यांना टेन्शन देऊ नका. तुम्ही नवीन वर्ष साजरं करा असा सल्ला देखिल आदित्य ठाकरे यांनी दिला. ते सिनेटच्या मिटींगनंतर माध्यमांशी बोलत होते.

सिनेटच्या बैठकीला आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. तसेच शिंदे गटावर निशाना साधताना नवीन वर्ष साजरं करा, त्यांना टेन्शन देऊ नका असं म्हटलं आहे. तर या बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलण्याचे टाळल्याचे पाहायला मिळाले.

याच्याआधीही आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर चौफेर टीका केली आहे. तर त्यांनी राणीच्या बागेच्या महसुलाचा संदर्भावरून देखिल आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला सुनावले होते. तसेच राजकीय द्वेषातून नावे ठेवणाऱ्यांनी ही बातमी जरुर वाचावी.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील मुंबई प्राणिसंग्रहालयात उद्धव ठाकरे आणि मी जे काही साध्य करण्याचा प्रयत्न केला त्याचा अभिमान आहे. असेही त्यांनी म्हटलं होतं.

Published on: Jan 03, 2023 06:29 PM