गद्दारांच्या प्रश्नाला उत्तर देण्यास मी बांधिल नाही
आता गद्दार आमदार आम्हाला सवाल उपस्थित करत आहेत, मात्र गद्दारांच्या प्रश्नाला आम्ही उत्तर देण्यास बांधिल नाही असंही त्यानी यावेळी शिंदे गटाला सुनावलं. त्यांच्या या टीकेमुळे आताआणखी राजकारण चिघळणार असल्याचे दिसत आहे.
कोरोना काळातील कामगिरीमुळेच देशातील पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले गेले आहे, त्यांच्या कार्यशैलीमुळे. मात्र तरीही शिवसेना पक्षातून बंडाळी झाली, आणि त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणं बदलली, मात्र ही बंडाळी का झाली आणि चांगल्या मुख्यमंत्र्यांना डावलून अचानक अशी परिस्थिती का निर्माण झाली ते समजलं नाही अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी आपल्या भावना नाशिककरासमोर बोलून दाखवल्या. यावेळी ते म्हणाले की, आता गद्दार आमदार आम्हाला सवाल उपस्थित करत आहेत, मात्र गद्दारांच्या प्रश्नाला आम्ही उत्तर देण्यास बांधिल नाही असंही त्यानी यावेळी शिंदे गटाला सुनावलं. त्यांच्या या टीकेमुळे आताआणखी राजकारण चिघळणार असल्याचे दिसत आहे.
Published on: Jul 22, 2022 08:21 PM
Latest Videos