खूप प्रेम असल्यानं आम्हाला धोका दिला; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाबाबत नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडिओ
मतदारांनी पक्षाचे चिन्ह पाहून मतदान केले. त्यामुळे मतदारांनी निवडून आणलेले हे आमदार फुटले तर देशात लोकशाही राहिली आहे का असा प्रश्न निर्माण होतो. असं आमदारांना पळवून घ्यायला लागले तर देशात लोकशाही जिवंत राहिल का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
मुंबई : युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे(Aditya Thackeray ) यांच्या निष्ठा यात्रेला(Nishta Yatra) आजपासून सुरुवात झाली. आदित्य ठाकरे यांनी भायखळा येथील शाखा क्र. २१६ ला भेट शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर बोलताना आजारपणाचा फायदा घेत घात केला अशी भावनिक प्रतिक्रिया दिली.
जे कोणी मातोश्रीवर येत आहेत त्यांची निष्ठा आम्हाला कळतेय. महाराष्ट्रातील सगळे नागरिक उद्धव साहेबांसोबत उभे आहेत. त्यांनी जो काही आम्हाला धोका दिला आहे त्याबद्दल दुःख नक्कीच आहे. त्यांच्या चेहर्यावरील भाव पाहून मी असेल किंवा उद्धव साहेब असतील आमच्या सारख्या चांगल्या लोकांना राजकारणात जागा आहे का हा प्रश्न आता पडला आहे. हे दुर्दैव आहे. आम्ही जेव्हा जागोजागी फिरतो तेव्हा लोक येऊन भेटतात तेव्हा कळते की मागील दोन-अडीच वर्षात जे काही काम झाले ते जनतेने पाहिले आहे. ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांना आम्ही सर्व काही दिले आणि त्यांनीच आम्हाला धोका दिला. कुठे काय जोडायचे त्याला तुम्हीच पहा; पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे की देशात लोकशाही आता राहिली आहे का? अशी खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
मतदारांनी पक्षाचे चिन्ह पाहून मतदान केले. त्यामुळे मतदारांनी निवडून आणलेले हे आमदार फुटले तर देशात लोकशाही राहिली आहे का असा प्रश्न निर्माण होतो. असं आमदारांना पळवून घ्यायला लागले तर देशात लोकशाही जिवंत राहिल का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
शरद पवार यांनी शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न केल अशा हास्यास्पद प्रतिक्रिया कोणी देत असतील तर त्या गोष्टींकड लक्ष देऊ नये. जे काही घडले ते राज्याने नाही तर संपूर्ण देशाने आणि लोकांनी पाहिले की कसे लोकशाहीच्या विरोधात पावले उचलली गेली.
माझी निष्ठा यात्राही महाराष्ट्र प्रत्येक कोपऱ्यात जाणार आहे आणि ही निष्ठा यात्रा कोणाच्याही विरोधात नाही. त्यांचे आमच्यावर जे काही प्रेम आहे ते पाहतोच आहोत आणि म्हणून त्यांनी कदाचित धोका दिला असेल. उद्धव साहेबांच्या सर्जरीचा गैरफायदा घेऊन त्यांनी हा धोका दिला आणि म्हणून पुन्हा सांगतो हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढवा. आम्ही कोणावरही टार्गेट करत नाही आहोत आमची कामाची पद्धत नाहीच आणि आम्ही समाजकारण जास्त केले म्हणून कदाचित असा धोका झाला असेल.आज उद्धवजींनी सांगितले की आमच्या घराचे दरवाजे खुले आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले