आदित्य ठाकरेंचं भाषण सुरु होतं अन् अचानक 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा...

आदित्य ठाकरेंचं भाषण सुरु होतं अन् अचानक 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा…

| Updated on: Feb 13, 2023 | 2:17 PM

पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकी प्रचारसभेत आदित्य ठाकरे बोलायला उभे राहिले तेव्हा अचानकपणे 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या. पाहा व्हीडिओ...

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज महाविकास आघाडीची प्रचार सभा होतेय. या प्रचारसभेत आदित्य ठाकरे बोलायला उभे राहिले तेव्हा अचानकपणे 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना शिंदे-फडणवीस सरकार हे घटनाबाह्य आहे. त्यामुळे हे लवकरच कोसळणार, असं आदित्य ठाकरे म्हणाले. “काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची विचारधारा वेगवगळ्या असली तरी आम्ही लोकांसाठी सरकार स्थापन केलं. आता खोक्यांचं सरकार सत्तेत आलं आहे. त्या मागे भाजपची शक्ती होती. त्यांनी राक्षसी महत्वाकाक्षेने भरलेल्या लोकांना पाठिंबा दिला. उद्धव ठाकरे यांच्यावर दोन सर्जरी झालेल्या असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला गेला, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.

Published on: Feb 13, 2023 02:15 PM