“मुंबई महापालिकेत खोके सरकारचा भ्रष्टाचार”, आदित्य ठाकरे यांचा आरोप
मुंबईत सुरु असलेल्या ईडीच्या कारवाईवरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या ईडीच्या कारवाईवरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.”मुंबई महानगरपालिकेत गेल्या एका वर्षात खोके सरकारचा कारभार सुरु आहे. गेल्या एका वर्षात घोटाळे समोर आले आहेत. रस्त्याचा घोटाळा असेल, स्ट्रीट फर्निचर घोटाळा आणि सॅनिटरी पडॅच्या वेंडिग मशीनचा घोटाळा असो, अनेक घोटाळे या एका वर्षात झाले आहेत. दिल्लीश्वराच्या सांगण्यावरून मुंबई करांचा पैसा लुटला जातोय. यासाठी ठाकरे गटाचा महामोर्चा निघणार आहे. यासाठी 24 तारखेला शिवाजी नाट्य मंदिर येथे बैठक होणार आहे, तिथे प्रेजेंटेशन दिल जाईल,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.
Published on: Jun 23, 2023 11:15 AM
Latest Videos