“महाराष्ट्रात रोज लोकशाहीची हत्या, हे जग पाहतोय”, ट्वीट करत आदित्य ठाकरे यांची राज्य सरकारवर टीका
ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काल गद्दार दिवस, खोके दिवस साजर करण्यात आला. शिवसैनिक रस्त्यावर उतरून पन्नास खोके, एकदम ओकेच्या घोषणा देऊ लागला. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड सुरु केली. शाखेत घुसून शिवसैनिकांना अटक केली. यासंबंधित घटनेमुळे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई : ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काल गद्दार दिवस, खोके दिवस साजर करण्यात आला. शिवसैनिक रस्त्यावर उतरून पन्नास खोके, एकदम ओकेच्या घोषणा देऊ लागला. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड सुरु केली. शाखेत घुसून शिवसैनिकांना अटक केली. यासंबंधित घटनेमुळे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्वीट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “महाराष्ट्रात रोजच्या रोज लोकशाहीची हत्या होत असल्याचं सारं जग पाहत आहे. आज शिवसेनेच्या पदाधिकार्यांना त्यांच्या घरातून आणि कार्यालयातून ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचा वापर केला गेला. कारण काय? तर गद्दार गँगच्या मिंधे म्होरक्याला त्यांनी केलेल्या गद्दारी व भ्रष्टाराविरुद्ध आंदोलन झाल्यास जनक्षोभाला सामोरं जावं लागेल आणि तोंड लपवावं लागेल ह्याची भिती वाटते. मला प्रश्न पडलाय की, महाराष्ट्रात राजकीय विरोध करायला बंदी आहे का?” आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून व्हिडीओ शेअर करत राज्य सरकारवर ही टीका केली आहे.