आदित्य ठाकरे यांच्याकडून आणखी एक घोटाळा उघड; नेमकं प्रकरण काय?

आदित्य ठाकरे यांच्याकडून आणखी एक घोटाळा उघड; नेमकं प्रकरण काय?

| Updated on: Aug 07, 2023 | 2:31 PM

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज तातडीने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी एमएसआरडीसीचा टोल घोटाळा उघड केला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका केली.

मुंबई, 7 ऑगस्ट 2023 | ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज तातडीने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी एमएसआरडीसीचा टोल घोटाळा उघड केला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, ” मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रूतगती मार्ग महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. त्याचं मेंटनन्स महापालिका करत आहे. मागच्या नोव्हेंबरमध्ये मुंबईतील वेस्टर्न आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे पालिकेला सुपूर्द करण्यात आले आहेत. पालिकेने या दोन्ही रस्त्याची डागडुजी, रंगरंगोटी आदी गोष्टी करायच्या आहेत. पालिकेच्या खर्चातूनच या गोष्टी होत आहेत. महापालिका मुंबईकरांकडून कर घेते. या कराच्या पैशातून या रस्त्याची डागडुजी आणि देखभाल केली जात आहे. या दोन प्रमुख रस्त्यांचं मेंटेनन्स महापालिका करतयं तर तिथल्या टोल नाक्याचा पैसा एमएसआरडीसीकडे का जातोय? या रस्त्यावरील होर्डिंगजचा पैसा एमएसआरडीसीकडे का जात आहे? या दोन्ही रस्त्यावर एमएसआरडीसी टोल का घेत आहे? हा पैसा कुणाला दिला जात आहे? मुंबईकर आधीच महापालिकेला कर भरतात. त्यात हा टोलचा पैसाही मुंबईकरांनी का द्यावा? मुंबईकरांवर दुप्पट कर कशासाठी? देशात सर्वाधिक कर मुंबईकर देत असतो. मुंबईला पिळून काढलं आहे.”

Published on: Aug 07, 2023 02:31 PM