मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंची टीका; म्हणाले, “हे अलिबाबा…”
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये त्यांनी जाहीर मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून टीका केली आहे.
नाशिक, 22 जुलै 2023 | ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये त्यांनी जाहीर मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, “मुख्यमंत्री जे घटनाबागह्य आहेत, बेकायदेशीर आहेत, अलिबाबा अन् गद्दार आहेत, त्यांचं नेहमी लोकेशन बघा. प्रत्येक दोन दिवसांनी ते दिल्लीला जातात.” आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अलिबाबा असा उल्लेख केला आहे.
Published on: Jul 22, 2023 03:21 PM
Latest Videos