Aditya Thackeray : सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
Aditya Thackeray On Nagpur Violence : आमदार आदित्य ठाकरे यांनी नागपूर हिंसाचार प्रकरणावरून शंका उपस्थित करत सरकारमधूनच कोणीतरी मुख्यमंत्र्यांची प्रतिमा डॅमेज करत असल्याचं म्हंटलं आहे.
नागपूरची घटना म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला डॅमेज करण्याचा प्रयत्न आहे, असं शिवसेना उबठा गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हंटलं आहे. सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करत आहे, अशी शंका देखील यावेळी आदित्य ठाकरे यांनी घेतली. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
नागपूरमध्ये सोमवारी रात्री 2 गटात तूफान राडा झाला होता. त्यानंतर या घटनेवरून आता आदित्य थकरे यांनी शंका उपस्थित केली आहे. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा डॅमेज करण्याचा कोणीतरी प्रयत्न करत आहे. कारण ते गृहमंत्री आहेत. प्रश्न त्यांना विचारले जातील. सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारमध्ये काहीतरी गडबड आहे, असंही आदित्य ठाकरे यांचं म्हणण आहे.

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक, 'या' वेळात प्रवास कराल तर...

येत्या 48 तासात महाराष्ट्रावर मोठं संकट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट

'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या

नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
