“आईच्या पोटी कोणी…”, विधानसभेत आदित्य ठाकरे आणि गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली!
अधिवेशनात शुक्रवारी ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आणि शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांच्यातील शाब्दिक युद्ध चांगलंच रंगलं. आदित्य ठाकरे यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांच्या अभ्यासावरून टोला लगावला तर गुलाबराव पाटलांनीही आपल्या खास शैलीत आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं.
मुंबई, 22 जुलै 2023 | महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अधिवेशनात शुक्रवारी ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आणि शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांच्यातील शाब्दिक युद्ध चांगलंच रंगलं. आदित्य ठाकरे यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांच्या अभ्यासावरून टोला लगावला तर गुलाबराव पाटलांनीही आपल्या खास शैलीत आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं.यामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप करण्याची वेळ आली. नेमकं या दोघांमध्ये कोणत्या मुद्द्यावरून वाद सुरु झाला, यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Jul 22, 2023 07:32 AM
Latest Videos