24 तासात पालकमंत्र्यांचं कार्यालय रिकामं करा, नाहीतर…, आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारला इशारा

“24 तासात पालकमंत्र्यांचं कार्यालय रिकामं करा, नाहीतर…”, आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारला इशारा

| Updated on: Jul 21, 2023 | 2:46 PM

मुंबई महापालिकेतील सर्व पक्ष कार्यालय आणि समिती कार्यलय अनेक महिन्यापासून बंद आहेत. पक्ष कार्यालय बंद असताना मुंबई महापालिकेत पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना स्वतंत्र कार्यालय देण्यात आलं आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे.

मुंबई, 21 जुलै 2023 | मुंबई महापालिकेतील सर्व पक्ष कार्यालय आणि समिती कार्यलय अनेक महिन्यापासून बंद आहेत. पक्ष कार्यालय बंद असताना मुंबई महापालिकेत पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना स्वतंत्र कार्यालय देण्यात आलं आहे. पालकमंत्री नागरिक कक्ष कार्यालय म्हणून नवीन कार्यालय सुरु करण्यात आलं आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, “आम्हाला मुंबईचे आमदार म्हणून महापालिकेत केबिन दिली पाहिजे. या दालनात पालकमंत्री नाहीत तर भाजपचे माजी नगरसेवक बसले होते. नगरसेवकांची कार्यालये बंद केली. पण आता हे महापालिकेत घुसखोरी करून दादागिरी करत आहेत. हुकूमशाही चालवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे 24 तासात थांबलं नाही. केबिन खाली केली नाही तर कधी ना कधी तरी मुंबईकर राग व्यक्त करतील. त्याला जबाबदार कोण असेल माहीत नाही.”

Published on: Jul 21, 2023 02:46 PM