चिमुकल्याचा आदित्य ठाकरेंना दिला विश्वास

चिमुकल्याचा आदित्य ठाकरेंना दिला विश्वास

| Updated on: Sep 03, 2022 | 9:01 AM

आदित्य ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है आशा घोषणा दिल्या. त्यावेळी त्या चिमुकल्याची आदित्य ठाकरे यांनी विचारपूस करत त्याच्याशी बातचीतही केली आहे. या लहान शिवसैनिकाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. लहान मुलाने आदित्य ठाकरे यांच्या नावाच्या आणि आगे बढोचा नारा दिल्याने शिवसैनिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

राज्यात बंडखोरी नाट्य घडल्यानंतर शिवसेना, शिंदे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. त्यातच आत गणेशोत्सवानिमित्त राजकीय नेत्यांनी गणरायाच्या दर्शनासाठी आपापल्या परिसरात भेटीगाठी देण्यास सुरुवात केली आहे . आदित्य ठाकरे यांनीही गिरगावमधील शिवसेना शाखाप्रमुख पांडूरंग सपकाळ यांच्या सार्वजनीक गणेश मंडळाला भेट दिली. त्यावेळी एका चिमुकल्याने आदित्य ठाकरे गणेश मंडपात आल्यानंतर शिवसेना आगे बढो आणि आदित्य ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है आशा घोषणा दिल्या. त्यावेळी त्या चिमुकल्याची आदित्य ठाकरे यांनी विचारपूस करत त्याच्याशी बातचीतही केली आहे. या लहान शिवसैनिकाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. लहान मुलाने आदित्य ठाकरे यांच्या नावाच्या आणि आगे बढोचा नारा दिल्याने शिवसैनिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा रंगली आहे.