महत्त्वाची बातमी, डिलाईल रोड पूल बाप्पांच्या आगमाच्या आधी होणार सुरू? आदित्य ठाकरे यांनी काय केल्या सुचना
या पुलाचे काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे. मात्र मुंबईत होणाऱ्या सततच्या पावसामुळे आणि काही तांत्रिक अडचणींमुळे त्याचे काम संथ गतीने होताना दिसत आहे. याच्या आधी या पुलाचे काम डिसेंबर 2022 पर्यंत पुर्ण होणार होता.
मुंबई, 8 ऑगस्ट 2023 | मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार दक्षिण मुंबईतील डिलाईल रोड पूल सध्या कामामुळे बंद आहे. या पुलाचे काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे. मात्र मुंबईत होणाऱ्या सततच्या पावसामुळे आणि काही तांत्रिक अडचणींमुळे त्याचे काम संथ गतीने होताना दिसत आहे. याच्या आधी या पुलाचे काम डिसेंबर 2022 पर्यंत पुर्ण होणार होता. तो आजही पुर्ण झालेला नाही. तर आता तो ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान या पुलाच्या कामाची पाहणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच संथ गतीने सुरू असलेल्या कामाबद्दल देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हा मार्ग गणपती पर्यंत सुरू करावा अशा सुचना त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यामुळे आता हा मार्ग गणपतीपर्यंत सुरू होतो का आता हे पाहावं लागणार आहे.
Published on: Aug 08, 2023 08:31 AM
Latest Videos